⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दोन गावठी कट्ट्यासह आठवडे बाजारातून आवळल्या ‘डॉलर’च्या मुसक्या

दोन गावठी कट्ट्यासह आठवडे बाजारातून आवळल्या ‘डॉलर’च्या मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलिसांची गेल्या काही दिवसापासून धडाकेबाज कामगिरी सुरु आहे. गेल्याच आठवड्यात वृद्धांना लुटणाऱ्या आरोपीला गजाआड केल्यानंतर आज दमदार कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. मासूमवाडीच्या आठवडे बाजारात २ गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या खलील अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली, वय 29 वर्ष, रा.गेंदालाल मील याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एमआयडीसीचे कर्मचारी सुधीर साळवे, हेमंत कळसकर यांच्या गोपनीय माहितीवरून त्याला अटक करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधीर साळवे, हेमंत कळसकर यांच्या गोपनीय माहितीवरून गेल्या आठवड्यात वृद्धांना लुटणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची त्याने कबुली दिली होती. गुरुवारी सुधीर साळवे, हेमंत कळसकर यांना मासूमवाडीत एक तरुण गावठी कट्टे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षकांना कळविल्यानंतर कर्मचारी अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्द, सचिन पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.

मासूमवाडी आठवडे बाजारात आल्यानंतर पोलिसांनी काही अंतरावर वाहन उभे करून पायी शोध सुरु केला. बाजारात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या एका तरुणाची पोलिसांनी चौकशी करताच तो पळून जाऊ लागला असता पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले. तरुणाची झाडाझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे दोन कट्टे मिळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधीर सावळे, हेमंत कळसकर, चंद्रकांत बळीराम अशांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीला दुपारी न्या.ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दि.१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ऍड.सुरळकर यांनी कामकाज पाहिले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.