⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्यपालांचा ऍड. कुणाल पवारांकडून निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आयोजित औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांचा ऍड. कुणाल पवार यांनी निषेध व्यक्त करत याबाबत राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आपण जेष्ठ वरीष्ठ आहात आपल्या जे संविधानिक पद भेटले आहे. ते आपल्या शिवाजी राज्यांनी उभारलेल्या स्वराज्यातील राज्य घतने मुळेच आहे. असे आम्हाला वाटत आहे. महाराज नसते तर नसली अस्ती अंगणात तुळस आणि मंदिरावर कळस…..महाराजांची युद्ध निती शस्त्रनिती अर्थ निती किल्ले बांधकाम स्त्री विषयी सन्मान त्यांचे वाचन लिखाण राजकारण सर्व समाज घेवून निर्माण करणारा भाईचारा हा वाखण्याजोगा आहे तरी पण अशी खंत आहे की, आपण त्यांना एका रामदास स्वामी संधर्भ जोडून त्यांचे खरे गुरू डावलण्याच काम करत आहात. आपल्याला जर आवड असेल तर आणि खरा इतिहास जाणून घ्यायचं असेल तर आम्ही सर्व मंडळी आपल्याला खरी इतिहासाची पुस्तके जी न्यायालयाने देखील मान्य केली आहेत. ती द्यायला तयार आहोत आपण आपल्या सवडीने वेळ द्यावा, आम्ही सर्व शिव प्रेमी तत्काळ आपली भेट घेवून तुम्हाला अवलोकन करण्यासाठी उपलब्ध करून देवू असे निषेधार्थ निवेदन ॲड. कुणाल पवार यांनी पाठवले आहे.