⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, शिवाजी महाराज हे..

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान केलं आहे.आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते.दरम्यान, राज्यपालांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या असून ते अधूनमधून काही विधाने करतात आणि त्यावरून वाद निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यावर सारवासारव करण्याचीही नामुष्की ओढवते. आता त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला फोडणी दिली आहे.

राज्यपालांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही तर आहेतच पण शिवद्रोही सुद्धा आहेत. एकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील गडकिल्ल्यांवर फिरा मग कळेल शिवाजी महाराज कोण होते …. उगीच उठायचं आणि टाळाला हे धंदे बंद करा असा इशाराही त्यांनी दिला.