⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खुशखबर : नागपूर – मडगाव विशेष‎ रेल्वे गाड्या धावणार‎

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । भुसावळ‎ प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य‎ रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव‎ दरम्यान २० अतिरिक्त विशेष गाड्या‎ चालविण्याचा निर्णय घेतला आहे.‎ यामुळे प्रवाशांची हाेणारी गर्दी‎ विभागली जाणार आहे, त्यांच्या‎ जागेचा प्रश्नही मिटणार आहे.‎ यात ०११३९ विशेष गाडी २७ जुलै‎ २०२२ ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक‎ बुधवारी आणि शनिवारी नागपूर‎ येथून दुपारी ३.५ वाजता सुटेल.‎

मडगाव येथे दुसऱ्या दिवशी‎ सायंकाळी ५. ३० वाजता ही गाडी‎ पोहोचेल. ०११४० ही विशेष गाडी २८‎ जुलै २०२२ ते २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत‎ दर गुरुवार आणि रविवारी मडगाव‎ येथून सायंकाळी सातला सुटणार‎ आहे. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या‎ दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.‎ या गाड्यांना वर्धा, पुलगाव,‎ धामणगाव, बडनेरा, अकोला,‎ मलकापूर, भुसावळ, नाशिकरोड,‎ इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा,‎ माणगाव, वीर, खेड, चिपळूण,‎ अरावली रोड, संगमेश्वर रोड,‎ रत्नागिरी, आडवली, विलवडे,‎ राजापूर रोड, वैभववाडी रोड,‎ नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग,‎ कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि,‎ करमळी येथे थांबा आहे. यात एक‎ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय‎ वातानुकूलित, ११ शयनयान, ६‎ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे या‎ गाडीला असतील.‎