Good News : LPG सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांनी कमी झाले दर!
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्व बाजूने फक्त महागाईचच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्ली 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता. दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2132 रुपये होती. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.