जळगाव जिल्ह्यातून महिलेसह पाच गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

ऑगस्ट 28, 2023 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावातील ५ जणांचा प्रस्ताव मंजूर झाले आहेत. विविध गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे.

haddpar crime jpg webp

हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे?
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये भावना जवाहरलाल लोढा (३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (३४, रा.तांबापुरा) यांचा समावेश आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील हद्दपार प्रस्तावाननुसार वरील पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाणे, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे, पहूर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे, चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पाचही जणांनी सदरचे गुन्हे टोळीने केले. तसा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन त्यात माहिती निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकां एम. राजकुमार यांनी पाचही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपारीचे आदेश दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now