⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Good News : जीएमसीत सहा महिन्यात १८९ जणांच्या मोफत शस्त्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी २०२२ । “शावैम” व रुग्णालयात कोरोना विरहित रुग्णसेवा सुरु झाल्यानंतर सहा महिन्यात एकूण १८९ रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे हर्निया आजाराचे आहे.

गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागातच असल्याने रुग्णांना याचा सहज लाभ घेता येत आहे. योजनेमधून २२ जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोरोनाविरहित १८९ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. तर किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्यांना लाभ झाला.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागातच असल्याने रुग्णांना याचा सहज लाभ घेता येत आहे. योजनेमधून २२ जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोरोनाविरहित १८९ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. तर किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्यांना लाभ झाला.

हाडांच्या शास्त्रक्रियांसाठीही लाभ

सहा महिन्यात १८९ रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या असून यात सर्वाधिक ७५ हर्निया आजाराच्या झाल्या आहे. त्यापाठोपाठ हाडांसंबंधित तर गंभीर जखम झालेल्या अशा ४१ तर महिलांचा विविध आजारांच्या १२ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहे. महात्मा फुले योजनेचे काम करण्यासाठी स्वतंत्र टीम असून ती रुग्णांच्या वॉर्डापर्यंत जाऊन काम करते. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळत आहे.