⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! गव्हाचे दर तीन हजार रुपये क्विंटलपुढे जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | जळगाव जिल्ह्यात जो गहू सर्वाधिक खाल्ला जातो. किंबहुना सर्वसामान्य घरात पाेळी ज्या ‘वन फाेर सेव्हन’ नावाच्या गव्हापासून बनते त्याचे दर यंदा ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या वर जाण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरवड्यात क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ हाेऊन २०० रुपयांची घसरण झालेली असताना आता पुन्हा साेमवारपासून २०० रुपयांनी भाव वाढले आहेत. या दरवाढी मागे इजिप्त देशात केली जाणारी निर्यात आहे. त्यामुळे आगामी महिन्यात गव्हाच्या किमतीत आणखी वाढ हाेण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.


रशिया-युक्रेन या देशातील युद्धाचे पडसाद जगभरावर पडत आहेत. सद्य:स्थितीत भारताला गव्हाच्या निर्यातीचे द्वार यामुळे खुले झाले आहेत. भारत- इजिप्त (मिस्र) या देशाला चालू एप्रिल महिन्यात २ लाख ४० हजार टन गव्हाची निर्यात करणार आहे. त्यामुळे देशांतर्गत गव्हाच्या पुरवठ्याची पारंपरिक साखळी प्रभावित झाली आहे. त्यातून ही दरवाढ झाली आहे.


सर्वाधिक गहू आयात करताे इजिप्त : जगातील सर्वाधिक गव्हाची आयात करणारा देश इजिप्त आहे. गव्हाची ही गरज इजिप्त रशिया आणि युक्रेन या दाेन देशांतून नेहमी गव्हाची आयात करून भागवताे; परंतु या दाेन्ही देशात युद्ध सुरू असल्याने त्याला पर्याय म्हणून इतर देशांकडे मागणी करावी लागत अाहे. महाराष्ट्रात स्थानिक गव्हासाेबत मध्य प्रदेश व राजस्थान या दाेन राज्यातून गहू येताे. राजस्थानातील ५० टक्के गहू हा महाराष्ट्रात न येता, निर्यातीसाठी कांडला पाेर्टकडे रवाना हाेत आहे.