मोठी बातमी ! प्रवाशांनी भरलेली एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

ऑगस्ट 17, 2022 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । गोंदिया (gonidya) जिल्ह्यामध्ये रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आलीय. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. दरम्यान, या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

gondia railway accident jpg webp

नेमकी काय आहे घटना?
पहाटे साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना एकच धक्का बसला. डब्ब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला त्यामुळे 50 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले. सुदैवाने रेल्वेचे वेग जास्त नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने शासकीय आणि नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

काही जणांना किरकोळ जखमा असल्यामुळे प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. घटनास्थळी रेल्वेे कर्मचारी पोहोचलेले आहे, मदतकार्य सुरू आहे. परंतु, नेमका हा अपघात कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही, रेल्वेचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now