Jalgaon : जिल्ह्यातील युवक-युवतींना विदेशात रोजगाराची संधी; 1 लाखापेक्षा अधिक वेतन मिळेल, इच्छुकांनी असा करावा अर्ज?

जानेवारी 29, 2025 3:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

job

२५ ते ४५ वर्षे वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. उमेदवारांकडे घरगुती सहाय्यक सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परीसर, जी. एस. ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now