जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापूर्वी इराण-इस्त्रायल युद्धाला विराम लागताच सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी घसरण दिसून आली. सोने लाखांच्या खाली घसरले. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मागच्या काही दिवसात सोने दरात पुन्हा वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. ज्यामूळे सोन्याचा तोळा जीएसटीसह पुन्हा 1 लाखांच्या वर गेला आहे. परंतु आज सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

आज १ तोळा सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे आता सोन्याचा दर ९८,७३० रुपये आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आज भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो.

२४ कॅरेट सोन्याचा भाव
गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९८,७३० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ४८० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,९८४ रुपये आहेत. १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,८७,३०० रुपये आहे.१०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९०,५०० रुपये आहे. काल हे दर ९१,०५० रुपये होते. या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,४०० रुपये आहेत. या दरात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे.१०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५५०० रुपयांनी घसरण झाली आहे.
चांदीचा दर
आज चांदीच्याही दरात घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८८० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१०० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहेत.












