आठवड्याच्या पहिल्याच सोने-चांदीचे भाव स्थिर ; खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या नवीन दर..

जुलै 28, 2025 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दराने ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठले. सोन्याचा दर विनाजीएसटी १ लाखाच्या वर गेला होता तर चांदीचा दरही जीएसटीसह १ लाख २० हजारापर्यंत गेला होता. मात्र मागच्या काही दिवसात दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. मात्र अद्यापही सोन्याचा दर आवाक्याबाहेर आहेत. दरम्यान आज खूप महिन्यानंतर सोन्याचे भाव स्थिर आहेत. सोन्याच्या दरात काहीही बदल झालेला नाही.

gold silver 1 jpg webp

आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर जैसे थे आहेत. सोबतच चांदीचा दर देखील स्थिर आहे. आज अनेक दिवसानंतर सोन्याचे दर एकही रुपयांनी घसरले नाही किंवा वाढले नाहीत. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करु शकतात. काल आणि आज सोन्याचे दर प्रति तोळा ९९,९३० रुपये आहेत. या दरात बदल केलेले नाहीत.

आज अनेक दिवसानंतर सोन्याचे दर एकही रुपयांनी घसरले नाही किंवा वाढले नाहीत. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करु शकतात. काल आणि आज सोन्याचे दर प्रति तोळा ९९,९३० रुपये आहेत. या दरात बदल केलेले नाहीत.

आजचे सोन्याचे दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९९,९३० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९४४ रुपये आहे. कालही हे दर सारखेच होते. तसेच २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९१,६०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,२८० रुपये आहेत.

चांदीचे दर

आज चांदीच्याही दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर जैसे थे वैसे आहेत. आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ९२८ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १,१६० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ११,६०० रुपये आहेत.

दरम्यान, सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सतत चढ-उतार असल्यामुळे खरेदीदारांना मात्र प्रश्न पडला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात चांगला मूहूर्त साधत अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now