Gold Rate : ग्राहकांना दिलासा, आज सोने-चांदी भाव घसरला, नवीनतम दर वाचा..

मे 20, 2025 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । सोने चांदी दरात चढ उतार सुरूच आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त किंमतीवर पोहचले होते. परंतु आता सोन्याचे भाव थोडेफार कमी होत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

gold silver jpg webp

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४९० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर ९५,०२० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७६,०१६ रुपये आहे. सोन्याच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर ८७,१०० रुपये प्रति तोळा आहे. या दरात ४५० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ३६० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६९,६८० रुपये आहे.१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतदेखील घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ७१,२७० रुपये आहे. या दरात ३६० रुपये प्रति तोळा कपात झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,०१६ रुपये आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घट झाल्याने ग्राहकांच्या खिशाला जास्त फटका बसणार नाही.

चांदीच्या दरातही घसरण
आज सोन्यासोबत चांदीच्याही दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत. आज १० ग्रॅम चांदी ९७० रुपयांवर विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९७०० रुपये आहे. यामध्ये १०० रुपयांनी घट झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment