सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

जुलै 7, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । आठवड्याच्या मध्यात तिस-या दिवशी भारतीय सराफा बाजाराने (Sarafa Market) सोन्या चांदीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold Price) भावात मोठी घसरण झालेली दिसून येतेय. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८२० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या (Silver Price) भावात आज १४० रुपयाची घसरण झालेली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ८४० रुपयाने स्वस्त झालं होते. दोन दिवसात सोने १६०० रुपयांहून अधिकने स्वस्त झाले आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp

काय आहे आजचे सोन्याचे भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,६८० रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,०६० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ केल्यानंतर मागील गेल्या तीन सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र बुधवारच्या सत्रात या दरवाढीला ब्रेक लागला होता. या आठवड्यात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झालं आहे. गेल्या दोन दिवसातील घसरणीनंतर सोने १६०० रुपयांहून अधिकने स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल १८०० रुपयांनी घसरलेली दिसून येतेय.

आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो

अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now