जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । सोने चांदी दरात चढ-उतार सुरु असून जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दोन दिवसाच्या वाढीनंतर बुधवारी सोने दरात किंचित घसरण दिसून आली. मात्र चांदी दरात मोठी वाढ वाढ झाली.

जळगावच्या सराफा बाजारात ५ मार्चला सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण झाली. यामुळे २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ८६८०० रुपये (जीएसटीसह ८९४०४) प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. तर चांदीचा दर १००० रुपयांनी वाढला. यानंतर आता चांदी ९८,००० रुपये किलोवर स्थिरावली. दरम्यान, होळीनंतर सोन्यात तेजी येईल, असा विश्वास ज्वेलर्स व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
यूएसची पॉलिसी, रशिया आणि युक्रेन युद्धबंदीच्या करारासोबत डॉलरच्या तुलनेत कमकुवत होणारा रुपया आणि शेअर बाजारातील पडझड अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सध्या भावावर परिणाम होत आहे. युद्धबंदी वा अन्य काही घटना घडामोडींचा विपरीत परिणाम झाला तरी सोन्याचे भाव ८२ हजार रुपये तोळ्याच्या खाली जाणार नाही अन्यथा आजच्या भावानुसार १०० ते १२० डॉलरची म्हणजेच (८००० ते १०,००० रुपये) उसळी घेईल अशी शक्यता आहे.