अबब..! जळगावमध्ये सोने-चांदी दराने रचला इतिहास, आताचे दर पाहून फुटेल घाम

जुलै 24, 2025 9:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात वाढ झाली. जळगावच्या सुवर्ण बाजारात बुधवारी दिवसभरात सोन्याच्या दरात प्रति तोळा ११३३ रूपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे विनाजीएसटी सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा ओलांडला. तर चांदीने नवीन विक्रम गाठला आहे. दरम्यान,सोने आणि चांदी दररोज नवीन उच्चांक निर्माण करत असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. Gold Silver Rate Today

GS24

एकीकडे सणासुदीचे दिवस जवळ येत असताना त्यापूर्वी सोन्यासह चांदीच्या किमतीने इतिहास रचला असून यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी ११३३ रुपयांनी महागलेले सोने प्रतितोळा विनाजीएसटी १,००,५३३ रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या दरात प्रति किलो २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. दरवाढीनंतर विशेषतः चांदीने एक लाख २० हजार ५१० रूपयांचा नवीन उच्चांक गाठला.

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत होते. चांदीच्या किमतीत गेल्या पाच दिवसात ४०९० रूपयांची वाढ झाली असून, दरवाढीत यापुढेही सातत्य राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. दर कमी झाल्याने मधल्या काळात सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक थोडेफार फिरकत होते. आता पुन्हा दरवाढ सुरू झाल्याने ग्राहक कमी होण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

दरवाढीचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते सध्याची जागतिक आर्थिक अनिश्चितता, परदेशी बाजारातील मागणीत झालेली वाढ, अमेरिकन डॉलरचे मूल्य कमी होणे आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित संपत्तीकडे कल, या सर्व गोष्टींमुळे सोने व चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय, भारतात सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने स्थानिक बाजारातही सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. परिणामी, देशांतर्गत व जागतिक स्तरावर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now