जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । सोन्याचा भाव दिवसेगणिक वाढताना दिसत असून या आठवड्यातही सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचा (Gold Rate) दर दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत बुधवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर तब्बल १४०० रुपयांनी वाढले. यामुळे सोन्याचा दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) दरातही २००० हजाराची वाढ झालीय. यामुळे आता सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. Gold Silver Rate Today

जळगावात आजचे भाव?
जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७८,०११ तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८५,१०० (जीएसटीसह ८७६५३) वर पोहचले. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव ९७,००० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह चांदी ९९,९१० रुपयावर पोहोचली आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत सोने ८८ हजाराचा (जीएसटीसह ९० हजारांचा) टप्पा गाठेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
दरवाढीचे कारण?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी डॉलर सक्षम करण्यासाठी जाहिर केलेल्या परराष्ट्रीय धोरणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कायम आहे. आपली अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी विविध देश मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहे. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात सतत मोठी वाढ होत आहे.
गेल्या पाच दिवसात सोने २५०० रुपयांनी तर चांदी २ हजाराने महागली आहे. १ तारखेला सोने ८२९०० होते ते बुधवारी ८५१०० रुपये तोळा झाले. तर ९५ हजार रुपये किलो असलेली चांदी ९७हजार रुपयांवर पोहोचली आहे.