⁠ 
शनिवार, मे 18, 2024

खुशखबर.. सोने दीड हजाराने तर चांदी १८५० रुपयाने स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । सोने चांदी (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण रशिया आणि युक्रेन (Rasia Urekain war) युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या भावाला आलं ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सुवर्णनगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५२० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी १८५० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात ७३० रुपयाची तर चांदीच्या भावात १४५० रुपयाची वाढ झाली होती.

जळगाव सोने-चांदीचा भाव?
आज जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,९८० रुपये इतका आहे. तर चांदी ७१,२१० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया आणि युक्रेन (Rasia Urekain war) युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. कोरोनाचा संसर्ग पहिल्या लॉकडाऊन काळात सोने ५६,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत वधारले होते. तर चांदी ७७ हजारांवर गेली होती. त्यानंतर आता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सोने पुन्हा ५५ हजारावर गेले होते. तर चांदी ७३ हजारावर गेली. मात्र अशातच सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुतीन यांनी सोन्याच्या खरेदीवर लागणारा मूल्यवर्धित कर (व्हॅट) हटवण्याची घोषणा केली आहे. रशियामध्ये सोनं खरेदीवर आधी खरेदी किमतीच्या २० टक्के व्हॅट द्यावा लागत होता. ग्राहक जेव्हा सोनं विकायला जात होते, तेव्हा त्यांना व्हॅटची रक्कम परत मिळत नव्हती.

रशियाच्या या निर्णयामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जळगाव सराफ बाजारात गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात जवळपास २५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ३५६० रुपयाची वाढ झाली आहे. मात्र आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५३,७९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५४,७७०, बुधवारी ५५,५००, गुरुवारी ५३,९८० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ७०,७८० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१० प्रति किलो इतका होता.