⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

gold silver rate : तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले सोन्याचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक हिंदू नववर्ष गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. यामुळे सोन्याचे दर कमालीचे वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळा 3700 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो 6000 रुपयांची ची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दहा ते अठरा मार्च या अवघ्या आठ दिवसात ही वाढ झाली आहे.

केंद्रीय अंदाजपत्रक आल्यांनतर सोन्यात आठशे रुपये तर चांदी तीन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र येत्या काळात पुन्हा एकदा सोना पाचशे रुपयांनी घसरल तर चांदी चार हजार रुपये घसरली. मात्र गेल्या आठ दिवसात सोन्यात चांगलीच भाव वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र दहा दिवसांनंतरही सोन्याचे दर तसेच राहिले होते. चांदीच्या दरात मात्र तब्बल पाच हजारांची घसरण झाली होती. मात्र आता नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे.