⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोन्याच्या किमतीने गाठला दोन महिन्यातील उच्चांकी स्तर ; वाचा आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद सराफ बाजारात उमटले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात २१० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आज चांदी वाधरली आहे. आज चांदीच्या भावात किंचित ५० रुपयाची वाढ झाली आहे.

आजचा सोने-चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,३४० रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५९,१५० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय रशियाने G7 देशांना सोन्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. अशा स्थितीत सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचे तज्ज्ञांच्या मत आहे. दरम्यान, जर सोने भाव वाढत गेला तर सोने त्याच्या विक्रमी उच्चांक 56,200 पर्यंत जाऊ शकते.

केंद्र सरकारने शुक्रवारी आयात शुक्ल वाढीनंतर सोन्याच्या भावात १५०० रुपयांची वाढ झाली होती. आजच्या सत्रात सोन्याचा भाव ५३ हजारांवर गेला आहे. मागील दोन महिन्यातील सोन्याचा हा उच्चांकी स्तर आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२७ जून २०२२- रुपये ५१,८१० प्रति १० ग्रॅम
२८ जून २०२२ – रुपये ५१,८४० प्रति १० ग्रॅम
२९ जून २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
३० जून २०२२ – रु ५१,९२० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२७ जून २०२२- रुपये ६१,१५० प्रति किलो
२८ जून २०२२ – रुपये ६१,३५० प्रति किलो
२९ जून मे २०२२- रुपये ६०,९३० प्रति किलो
३० जून मे २०२२- रुपये ६०,४५० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते