Gold Rate : आता सोन्याने केली हद्द, किमती पुन्हा वाढल्या ; जळगावच्या सुवर्णपेठेतील आताचे भाव पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२५ । बजेटनंतर सोन्याच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र बजेटनंतर सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आलीय. यामुळे सोन्याच्या किमतीने आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात वाढ झाली. दुसरीकडे चांदी दरात मात्र घसरण दिसून आली. सध्याच्या घडीला सोन्याचे दर जीएसटीसह ८५००० रुपयांच्या वर पोहोचले आहे.
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोने दरात प्रति तोळा ३०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याच्या दर विनाजीएसटी ८३,२०० रुपयावर (जीएसटीसह ८५,६९६) पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर १००० हजार रुपयांनी घसरून ९४००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
मागील एक आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दरात २१०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १९०० रुपयांनी वाढ झाली आहे. बजेट घोषित केल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमची किंमत २०० रुपयांनी वाढून ८२९००रुपयावर होते. दरम्यान, बजेटमध्ये सोन्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाहीय.