जळगाव जिल्हावाणिज्य

2 दिवसात सोने 2000 हजाराने तर चांदी 1000 रुपयांनी महागली ; जळगावातील दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीने मोठा डोंगर गाठला आहे. एकीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु मात्र याच दरम्यान सोन्याच्या किमतीने आजपर्यंत सगळे रेकॉर्ड मोडीत काढत नवीन उसळी घेतली आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल २००० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे जळगावात सोन्याचा तोरा ६८ हजार (विनाजीएसटी) रुपयावर आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर ७० हजार रुपयांवर गेला आहे. यामुळे सोनं हे सर्वसामान्य नागरिकाच्या आवाकाच्या बाहेर गेलं आहे. Gold Silver Rate 31 March 2024

जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याज दरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन परिणामी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात २००० रुपयांपर्यंतची वाढ झाली. यामुळे सध्या जळगावात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६८,६०० रुपयांवर पोहोचला आहे. तर जीएसटीसह सोनं ७०,६६० रुपयावर गेलं आहे.

दुसरीकडे गेल्या तीन दिवसात चांदी एक हजार रुपयांनी महागली आहे. सध्या जळगावात चांदीचा विनाजीएसटी दर ७६००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button