⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

सत्यजित तांबेंना निवडून देण्याची जवाबदारी गिरीश महाजनांवर?

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जानेवारी २०२३ | नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना निवडून देण्याची जवाबदारी भाजपाने आपल्या २ मोठ्या नेत्यांना दिली आहे. या निवडणुकीमध्ये मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीत उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यात टक्कर आहे. पर्यायी जोरदार प्रचार सुरु आहे. (satyajeet tambe and girish mahajan)

कोणताही अधिकृत उमेदवार नसतानाही नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपकडून बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. अधिकृतपणे पाठिंबा दिला नसला तरी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठीच भाजप रणनीती आखत असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपने आत्तापर्यंत आपला पाठिंबा कुणालाही जाहीर केला नसला तरी सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजपने एका वरिष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तांबेंना निवडून आणण्यााठीची संपूर्ण जबाबदारी भाजपने मंत्री गिरीश महाजन आणि माजी सिनेट सदस्य राजेश पांडे यांच्याकडे सोपवली असल्याचे म्हटले जात आहे.