⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Gold Siver Rate : दोन महिन्यात सोने 3500, तर चांदी 10 हजार रुपयांनी स्वस्त, आजची किंमत किती?

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । जागतिक पातळीवर मागील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येतेय. रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दरम्यान सोन्याचा (Gold Rate) प्रति तोळ्याचा भाव ५५ हजार ६०० रुपयांवर गेला होता. तो आता जवळपास ३५०० रुपयांनी कमी झाला आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) देखील ७३ हजारावर गेली होती. मात्र आता चांदीच्या किंमतीत तब्बल १० हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ दिसून आलीय. सोबतच चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे. जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीमध्ये या आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. तर चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,०६० रुपायांवर पोहोचले आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,२४० रुपयांवर आले आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटताच जगभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सोने दरात प्रंचड वाढ झाली होती. मार्च २०२२ मध्ये सोन्याचा भाव ५५,६०० रुपयांवर गेला होता. तो आता जवळपास ३५०० रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे चांदी देखील ७३ हजारावर गेली होती. ती आता १० हजार रुपयांनी घसरली आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
२७ मे २०२२ – रु ५२,०६० प्रति १० ग्रॅम
२८ मे २०२२ – बाजार बंद

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२६ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो
२७ मे २०२२- रुपये ६२,२४० प्रति किलो
२८ मे २०२२- बाजार बंद

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.