सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले, मात्र चांदी घसरली ; तपासून घ्या आजचे नवे दर

जून 29, 2022 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी दिवशी सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ झाली आहे. यामुळे सोने दर पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. मात्र, आज चांदीच्या (Silver Rate) दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या भावात १७० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात ४२० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ३० रुपयाने तर चांदी भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे.

gold

अमेरिकेसह G7 देशांनी रशियाकडून सोन्याच्या आयातीवर बंदी घातली असून, त्यानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उच्चांक स्तरावर जाण्याची शक्यता आहे. आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे आज बुधवारी जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,१०० रुपये इतका खाली आला. तर आज चांदीच्या भावात घसरण झाली असून एक किलो चांदीचा भाव ६०,९३० रुपये इतका खाली आला आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रशियाच्या निर्बंधांमुळे आगामी काळात सोन्या-चांदीचा पुरवठा कमी होणार असून मागणी वाढल्याने त्याची किंमत वाढणार आहे. येत्या काळात देशांतर्गत बाजारातही सोने आणखी महागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यापूर्वी सलग दोन आठवडे सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या भावात एक हजाराहून अधिकने घसरण झाली होती. तर चांदीच्या भावात तब्बल २५०० रुपयापर्यंतची घसरण झाली होती.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२७ जून २०२२- रुपये ५१,८१० प्रति १० ग्रॅम
२८ जून २०२२ – रुपये ५१,८४० प्रति १० ग्रॅम
२९ जून २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२७ जून २०२२- रुपये ६१,१५० प्रति किलो
२८ जून २०२२ – रुपये ६१,३५० प्रति किलो
२९ जून मे २०२२- रुपये ६०,९३० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now