Gold-Silver : सणासुदीत सोने-चांदी घसरतेय, आज ‘इतक्या’ रुपयाची झाली घसरण

सप्टेंबर 28, 2022 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । जागतिक संकेतांमुळे आज बुधवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती आज सलग तिसऱ्या दिवशी घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यवहारात 0.12 टक्क्यांनी घसरली आहे. चांदीचा दरही आज 0.92 टक्क्यांनी तुटला आहे. सोन्याचा भाव आता दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. Gold Silver Rate Today

gold silver rate 3

MCX वर आजचा सोन्याच्या भाव :
आज बुधवारी सकाळी 11 वाजेला MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 60 रुपयांनी घसरून 49,259 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर तब्बल 511 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 54,868 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,074 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,300 रुपये इतका आहे. तसेच चांदीचा प्रति किलोचा दर 56,000 रुपये इतका आहे. यापूर्वी चांदीचा 56,800 रुपये इतका दर होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5,500 ते 6000 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now