Gold Silver Rate : सलग दुसऱ्या आठवड्यात सोने चांदी झाली महाग, काय आहे आजचा प्रति तोळ्याचा दर?

मे 28, 2022 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात सोने चांदी दरात महागली आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,०६० रुपायांवर पोहोचले आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,२४० रुपयांवर आले आहे. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

gold silver 1

कोरोना (Corona Virus) महामारीनंतर आता मंकीपॉक्स (Monkeypox prevention) या विषाणूनं थैमान घातलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले असून त्यांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या आठवड्याच्या दरवाढीनंतर चालू आठवड्यात देखील सोने आणि चांदी महागली. या आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now