⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold-Silver Rate : सोने पुन्हा स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Gold-Silver Rate : सोने पुन्हा स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात किंचित ६० रुपयाची घसरण झाली. तर दुसरीकडे मात्र, चांदीचा भाव स्थिर आहे. आज चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाहीय. त्यापूर्वी काल सोने ३० रुपयाने घसरले होते; तर चांदी १० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोने-चांदीचा भाव?

आज जळगाव सराफ बाजारात सध्या १० ग्रॅम सोने ४९,१९० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,७६० रुपये इतके आहे. गेल्या या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.मात्र दुसरीकडे चांदी दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदी दरात दरात चढ-उतार आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात काहीशी घसरण दिसून आली होती. तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र, काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात किंचित घट झाली.

जगभरात कोरोना संसर्ग जोर पकडत असून पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक व इतर कारणांसाठी सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला. २३ डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६५० रुपये इतका नोंदविला गेला. २४ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७७० रुपये इतका नोंदविला गेला.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरू शकता. ‘‘BIS Care app’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की बनावट हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रारही करू शकता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.