⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…

सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । सोने आणि चांदी यांच्या दरात सातत्याने चढ उतार सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्या चांदीच्या दरात प्रचंड घसरण बघायला मिळते, तर दुसऱ्याच क्षणी दर उंच भरारी घेतात. आता पुन्हा सोन्या सोबत चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनं चांदी महाग झाल्याने याचा मोठा फटका ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.
जळगाव मध्ये देखील सोन्या चांदीच्या भावात वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव…
जळगावातील २४ कॅरेट सोन्याचा भाव सध्या ७३ हजाराच्या वर गेला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याची किंमत विनाजीएसटी ६४,९६० रू इतकी आहे.चांदीची देखील प्रति किलो ९१,००० रू इतकी किंमत आहे. उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात.

२२ कॅरेट आणि २४ कॅरेट मध्ये नेमका काय फरक आहे?
आपण कधीही सोनं खरेदी करत असतांना , सराफाकडून आपल्याला नेहमी विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेट चे सोने खरेदी करायचे आहे, की २४ कॅरेट चे ? याची माहिती तुम्हाला असणे देखील आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही खरेदी करत असलेले सोने शुद्धतेचे आहे की नाही. २४ कॅरेट चे सोने ९९.९% शुद्ध असते, आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातूंचे मिश्रण केले जाते, व त्या नंतरच दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेट मध्येच सोने विकतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.