⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : चार दिवसात चांदी 2500 रुपयाने स्वस्त, सोनेही झाले स्वस्त

Gold Silver Rate : चार दिवसात चांदी 2500 रुपयाने स्वस्त, सोनेही झाले स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार सुरु आहे. कालच्या दरवाढीनंतर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा घसरले आहे. सोबतच चांदी भावात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज जळगाव (Jalgaon) सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल ३९० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात २९० रुपयाची घट झाली आहे. चार दिवसात चांदीच्या भावात तब्बल अडीच हजार रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा सोने- चांदीचा भाव
गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,४०० रुपये इतका आहे. तर चांदी ६६,२०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, गेल्या मार्च महिन्यात ५५ हजारांवर गेलेल्या सोन्याच्या भावात सध्या मोठी घसरण झालेली दिसून येतेय. ९ मार्चला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

सध्या लगनसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते, या धातूंची मागणी वाढल्याने दर वाढू शकतात. मात्र, सध्या बाजारात सोन्यासह चांदीचे दर देखील घसरत आहे. यामुळे सोने चांदीची ही चांगली संधी आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात जवळपास ७०० रुपयाची घसरण झाली होती. तर दुसरीकडे चांदी २४०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.

तर या चालू आठवड्यात सोने ३ वेळा स्वस्त तर एक वेळा महागले आहे. या चार दिवसात सोने जवळपास १४०० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. त्यामुळे या चार दिवसात चांदी तब्बल २५०० हजार रुपयाने स्वस्त झाली आहे.

या आठवड्यातील दर
सोने :
जळगावमध्ये २५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,४९० रुपये होते. २६ एप्रिल रोजी ५२,६००, २७ एप्रिल रोजी ५२,७९० तर आज ५२,४०० प्रति तोळा इतका आहे.
चांदी : तर दुसरीकडे २५ एप्रिल रोजी चांदी दर ६८,११०, २६ एप्रिल ६६,६४०, २७ एप्रिल ६६,४९० तर आज २८ एप्रिल ला ६६,२०० प्रति किलो इतका होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.