Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, तपासा आजचा दर

जून 27, 2022 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । गेल्या अनेक दिवसापासून सोने-चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज सोमवारी सोने किंचित ३० रुपयांनी महागले आहे. तर २५० रुपयांनी महागले आहे.

gold silver jpg webp

आजच्या दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,७८० रुपये इतका खाली आला. तर एक किलो चांदीचा भाव ६०,९०० रुपये इतका खाली आला आहे.
तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

मागील दोन आठवड्यात सोन्याच्या भावात काहीशी घट दिसून आली. सोबतच चांदीच्या भावात देखील घसरण दिसून आली. गेल्या आठवड्याच्या पाच दिवसात सोने जवळपास ५०० रुपयांनी घसरले आहे. तर चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. पाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास २००० ते २२०० रुपयाची घसरण दिसून आली.

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now