⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने महाग, तर चांदी स्थिर ; हे आहेत आजचे जळगावातील नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२१ । जळगाव सराफ बाजारात मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. काल शनिवारी सोन्याचा दर स्थिर राहिल्यानंतर आज रविवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोने प्रति दहा ग्रम ११० रुपयांनी वाढले आहे. तर आज चांदीचा भाव स्थिर आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत आहे. तर दुसरी बाजूला अर्थव्यवस्था सावरू लागल्याने भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. याचा परिणाम सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानल्या गेलेल्या सोन्यावर झाला आहे. 

कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव हा मागील दोन महिन्यातील नीचांकी पातळीवर आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने ५६२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र जानेवारीपासून त्यात मोठी घसरण झाली. सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत ९००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागील गेल्या काही दिवसात जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. यामुळे थोडंस का होईना स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे. 

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७६० रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,६०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५३३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,३३० रुपये आहे.

चांदीचा भाव

तर आज चांदीचा दर स्थिर आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,४०० रुपये इतका आहे.