सोने दरातील घसरणीला ब्रेक, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे सोने-चांदीचे दर

एप्रिल 27, 2022 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । सलग दोन दिवसाच्या सोने दरातील घसरणीला आज ब्रेक लागले आहे. आज बुधवारी सोन्याच्या भावात वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे मात्र,चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगाव सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल १९० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात १५० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात तब्बल ८९० रुपयाची तर चांदीच्या भावात तब्बल १४७० रुपयाची घसरण झाली होती.

gold rate 2

आजचा सोने- चांदीचा भाव
मंगळवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७९० रुपये इतका आहे. तर चांदी ६६, ४९० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

सध्या लगनसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते, या धातूंची मागणी वाढल्याने दर वाढू शकतात. त्यातच अद्यापही रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. या दोघं देशांच्या युद्धादरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने ४ वेळा स्वस्त झाले आहे. तर एक वेळा महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही ४ वेळा घसरण तर एक वेळा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी २४०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर गेल्या दोन दिवसात सोने १०५० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी २०६० रुपयाने स्वस्त झाली होती

गेल्या आठवड्यातील दर
जळगावमध्ये १८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,२३० रुपये होते. १९ एप्रिल रोजी ५४,५२०, २० एप्रिल रोजी ५३,९९० तर, २१ एप्रिल ५३,८६०, २२ एप्रिल ५३,६४० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे १८ एप्रिल रोजी चांदी दर ७०,६५० प्रति किलो होती. १९ एप्रिल ७१,६२०, २० एप्रिल ७०,३८० तर २१ एप्रिल ला ७०,०१०, २२ एप्रिल ६८,७०० रुपये प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now