⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सलग दुस-या आठवड्यात सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीही झाली स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतमुळे लागोपाठ दुस-या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) घसरण झाली आहे. सोबतच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. चालू आठवड्यात घसरण झाल्याने सोने पुन्हा ५२ हजाराखाली आले आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,७८० रुपये इतका खाली आला. तर एक किलो चांदीचा भाव ६०,९०० रुपये इतका खाली आला आहे.

तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

मागील काही दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. तर दुसरीकडे शेअर बाजारातही चढ उतार सुरु आहे. गुंतवणुकदारांना (Investors) सोन्यात गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने त्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात दर वाढल्यास त्याचा फायदा गुंतवणुकदारांना होईल. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आलीय. पाच दिवसात सोने जवळपास ५०० रुपयांनी घसरले आहे. तर चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. पाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास २००० ते २२०० रुपयाची घसरण दिसून आली.

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते