गुडन्यूज ! सोन्या-चांदीत पुन्हा मोठी घसरण, त्वरित चेक करा नवीन दर

ऑगस्ट 22, 2022 2:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. दुसरीकडे, वायदे बाजारातही सोमवारी सोन्या-चांदीचे भाव नरमले. आज सोमवारी सकाळच्या सत्रात सोने तब्बल ३६४ रुपयांनी घसरले आहे. तर दुसरीकडे चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. Gold Silver Rate Today

gold silver

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सोन्याचा भाव घसरून 51,115 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आले. तर चांदीचा एक किलोचा भाव 54,891 रुपयांवर आले आहे. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोने 1106 रुपयांनी, तर चांदी 3780 रुपयांनी घसरली होती. दरम्यान,उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 52,200 रुपये इतका आहे. तर सध्या चांदीचा भाव 56,000 रुपये प्रति किलो इतका आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

राज्यातील चार शहरातील भाव:
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,600 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now