⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, घ्या जाणून आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात घसरण झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोने ११० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोने पुन्हा ५२ हजाराखाली आले आहे. तर दुसरीकडे चांदी २०० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोमवारी सोने १५० रुपये तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

काय आहे आजचा प्रति तोळ्याचा भाव?
आज जळगाव सराफ बाजरात एका तोळ्याचा भाव ५१,९२० रुपये इतका आहे. तर चांदी ६२,१७० रुपये प्रति किलोवर इतकी आहे.
तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात.या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

गेल्या आठवड्यात सोने दोन वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे. त्यामुळे हालचालीमुळे सोने किंचित ५० रुपयापर्यंत महागले आहे. तर दुसरीकडे चांदी किंचित १०० रुपये ते १५० रुपयांनी महागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम
१६ जून २०२२ – रु ५१,६२० प्रति १० ग्रॅम
१७ जून २०२२ – रु ५१,१८० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो
१६ जून मे २०२२- रुपये ६२,१२० प्रति किलो
१७ जून मे २०२२- रुपये ६२,९७० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते