⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोने 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, 50 हजारांच्या खाली घसरले, जाणून घ्या आजचे भाव

सोने 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, 50 हजारांच्या खाली घसरले, जाणून घ्या आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीचा परिणाम गुरुवारी भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा (Gold Rate) भाव जवळपास वर्षभरातील नीचांकी पातळीवर गेला. आज सोने २५९ रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ५० हजाराच्या खाली आले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही आज 400 रुपयांची घसरण दिसून येत आहे. Gold Silver Rate Today

सोन्याचा आजचा भाव?
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 49,958 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. याआधी सोन्याचा व्यवहार ५० हजारांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, मात्र मागणी कमी झाल्याने आणि जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण यामुळे लवकरच वायदेचे भाव ५० हजारांच्या खाली गेले. सोने सध्या त्याच्या आधीच्या बंद किमतीच्या तुलनेत सुमारे 0.5 टक्क्यांनी घसरला आहे.

चांदीचा आजचा भाव?
सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर, चांदीचा भाव सकाळी 480 रुपयांनी घसरून 55,130 रुपयांवर आला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 55,450 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, मात्र लवकरच जागतिक बाजाराचा दबाव दिसून येऊ लागला. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.88 टक्क्यांनी घसरली आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान आज जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून सोने जवळपास पाच महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. आज सकाळी यूएस मार्केटमध्ये स्पॉट गोल्डची किंमत $1,691.40 प्रति औंस होती, जी ऑगस्ट 2021 नंतरची सर्वात कमी पातळी आहे. सोने सध्या मागील बंद किमतीपेक्षा 0.20 टक्क्यांनी कमी आहे. जागतिक बाजारात, चांदीची स्पॉट किंमत देखील आज 18.62 डॉलर प्रति औंस झाली, जी मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.39 टक्क्यांनी कमी आहे.

महाराष्ट्रातील बड्या शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,४९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५६ रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.