⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोने झाले स्वस्त, चांदी पुन्हा महागली, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात तेजी दिसून आलीय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण झालीय. मात्र, दुसरीकडे चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोमवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात २८० रुपयाची घट झाली आहे. तर चांदी ४० रुपयांनी महागली आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१,२९० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६५,४०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडीमुळे गुंतवणुकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून आलं होतं. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने (Gold) गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. जळगाव सराफ बाजार पेठेत गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने तब्बल ७९० रुपयांनी महागले होते. तर दुसरीकडे चांदी ५८० रुपयांनी महागली होती. मागील आठवड्यात सोने जवळपास १२५० ते १३०० रुपयांनी वधारले होते. तर चांदीच्या दरात ६०० ते ७०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय. दरम्यान, आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५०,२७० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,०९०, बुधवारी ५०,५४०, गुरुवारी ५०,७८० आणि शुक्रवारी ५१,५७० रुपये इतका होता.

तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६४,४६० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,७४०, बुधवारी ६४,४७०, गुरुवारी ६४,७८० आणि शुक्रवारी ६५,३६० रुपये इतका होता. गेल्या पाच दिवसात चांदीच्या दरात जवळपास ११०० ते १२०० रुपयाची वाढ झाली आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :