जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । मागील काही दिवसापासून वाढत्या सोने आणि चांदीच्या दराला ब्रेक लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात १३० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल ३७० रुपयाने स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सोने ५३० रुपयाने तर चांदी १२४० रुपयाने स्वस्त झाली होती.
आजचा प्रति तोळ्याचा भाव? Gold Silver Rate Today
बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,८६० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,०१० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
सोन्या चांदीचे भाव हे दिवसातून दोनदा बदलतात. सकाळी मार्केट सुरू होताच भाव जाहीर होतात. तर दुसऱ्यांदा सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा एकदा भाव जाहीर केले जातात.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने दरात मोठी वाढ दिसून आली. रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठ्वड्यात सोने १२०० ते १३०० रुपयांनी महागले. तर दुसरीकडे चांदी २७०० ते २८०० रुपयांनी महागली.
दोन दिवसात सोने ६६० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी १६०० रुपयाने स्वस्त झाली आहे.
या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये १८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,२३० रुपये होते. १९ एप्रिल रोजी ५४,५२०, २० एप्रिल रोजी ५३,९९० तर आज २१ एप्रिल ५३,८६० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे १८ एप्रिल रोजी चांदी दर ७०,६५० प्रति किलो होती. १९ एप्रिल ७१,६२०, २० एप्रिल ७०,३८० तर आज २१ एप्रिल ला ७०,०१० प्रति किलो इतका होता.