Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमती पुन्हा महागल्या, वाचा नवीनतम किंमत

मे 20, 2022 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. काल झालेल्या घसरणीनंतर आज चांदीचा प्रति किलोचा दर ८१० रुपायांनी वधारला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ५० रुपयांनी महागले होते. तर चांदी ३९० रुपयांनी स्वस्त झाली होती.

gold silver rate 1 1

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज सोने प्रतीताेळा ५१,७३० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६३,०१० रुपयांवर पोहोचले आहेत.दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वरखाली होत असल्याचे दिसून आले. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. त्यात गेल्या मागील १५ ते २० दिवसात सोने आणि चांदीचे दर घसरताना दिसून आले.

१ मे रोजी ५२५०० रुपायांवर असलेला सोन्याचा दर गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी ५१ हजार रुपायांवर आला होता. तर दुसरीकडे चांदी ६५,५०० रुपायांवर होता. तर दोन ते तीन दिवसापूर्वी ६१ हजारांवर आला होता. मात्र या चालू आठवड्यात चांदी चार वेळा महाग तर एक वेळा स्वस्त झाली आहे. यात पाच दिवसात चांदी तब्बल ३ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोने ६०० ते ७०० रुपयांनी महागले आहे.

गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात सोने जवळपास ७०० ते ७५० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास ३६०० ते ३७०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६० हजाराच्या घरात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंचे दर वधारू लागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम
१९ मे २०२२ – रु ५१,४०० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो
१९ मे २०२२- रुपये ६२,२०० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now