अक्षय तृतीयेपुर्वी सोने पुन्हा महागले, खरेदीला जाण्याआधी वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

मे 2, 2022 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच सोन्याच्या भावात वाढ झाल्याने सोने पुन्हा ५३ हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ५१० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज सोमवारी चांदीचा ३७० रुपायांनी स्वस्त झाली आहे.

gold silver 1

आजचा सोने चांदीचा भाव?
आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,९७० रुपये इतका आहे. तर चांदी ६५,०५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, अक्षय तृतीया (Akshay Tritiya) अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. तीन मे रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त माणण्यात येते. या दिवशी सोन्याची (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनामुळे अक्षय्य तृतीयेला साेने खरेदीचा मुहूर्त साधता आलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेला साेने खरेदीसाठी माेठी गर्दी हाेण्याचा अंदाज आहे.तसेच यंदाच्या लग्नसराईच्या सिझनमधील मार्च आणि एप्रिल या दाेन्ही महिन्यात लग्नाचे मुहूर्त फारसे नव्हते. ते मे-जून या दाेन महिन्यात अधिक आहेत. त्याचा परिणाम अक्षय्य तृतीयेला खरेदी वाढण्याचा सुवर्णकारांचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १३५० ते १४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. यापूर्वी गेल्या मार्च महिन्यात रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५५ हजारांवर गेला होता. तर चांदीच्या दर तब्बल ७३ हजारावर गेला होता. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली.

गेल्या आठवड्यातील दर
सोने : जळगावमध्ये २५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,४९० रुपये होते. २६ एप्रिल रोजी ५२,६००, २७ एप्रिल रोजी ५२,७९० तर २८ एप्रिल रोजी ५२,४०० आणि २९ एप्रिल ला ५२,४६० प्रति तोळा इतका आहे.
चांदी : तर दुसरीकडे २५ एप्रिल रोजी चांदी दर ६८,११०, २६ एप्रिल ६६,६४०, २७ एप्रिल ६६,४९० तर २८ एप्रिल ला ६६,२००, आणि २९ एप्रिलला ६५,४२० प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now