Gold Silver : विक्रमी उच्चांकावरून सोने 3500 रुपायांनी स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

जून 2, 2022 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. यावेळी सोने ५२ हजारांच्या खाली आले असून विक्रमी उच्चांकावरून ३५०० हजार रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. मात्र दुसरीकडे आज चांदी दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ७० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात ४६० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी सकाळच्या सत्रात सोने ६० रुपयाची तर चांदी ७७० रुपयाची घसरण झाली होती.

gold silver

जळगावातील सोने-चांदीचा भाव?
आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,९८० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,०२० रुपयावर आला आहे.सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष सोन्याच्या दरांकडे असतं.

वर्षी मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते ५५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत पोहचले होते. तर चांदी तब्बल ७३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र तीन महिन्यात सोन्याचे दर जवळपास ३५०० हजाराहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा सध्याचा दर देखील त्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे १० हजार रुपये कमी आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
३० मे २०२२- रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
३१ मे २०२२ – रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
१ जून २०२२ – रु ५२,०५० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
३० मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
३१ मे २०२२ – रुपये ६३,३३० प्रति किलो
१ जून मे २०२२- रुपये ६२,५६० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now