⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सोने-चांदीचे दर पुन्हा उच्चांकाच्या दिशेने ; वाचा आजचे तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) दरात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. कालच्या घसरणीनंतर आज मंगळवारी सोने आणि चांदीचे दर पुन्हा महागले आहे. आज जळगाव सराफ बाजारात बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ९७० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने १०० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी ४४० रुपयाने स्वस्त झाली होती.

आजचा प्रति तोळ्याचा भाव? Gold Silver Rate Today
मंगळवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,५२० रुपये इतका आहे. तर चांदी ७१,६२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने आणि चांदीला मात्र तेजीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने दरात मोठी वाढ दिसून आली. रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते

गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

जळगाव सराफ बाजारात गेल्या आठ्वड्यात सोने १२०० ते १३०० रुपयांनी महागले. तर दुसरीकडे चांदी २७०० ते २८०० रुपयांनी महागली. दरम्यान, चालू आठवड्यात सोने दर ५४ हजारापुढे गेले आहे. तर चांदीने देखील ७१ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ११ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,२९० रुपये होते. १२ एप्रिल रोजी ५३,४००, १३ एप्रिल रोजी ५४,१२०, तर १४ एप्रिल ५४,३३० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे ११ एप्रिल रोजी चांदी दर ६८,५६० प्रति किलो होती. १२ एप्रिल ६८,८७०, १३ एप्रिल ७०,४०० तर १४ एप्रिल ला ७१,०९० प्रति किलो इतका होता.

सोन्याची प्युअरीटी कशी तपासावी?
सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.