⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ ; सोन्याने ओलांडला ५२ हजाराचा टप्पा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात(Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किंमतीत चढ उतार होत आहे. आज शुक्रवारी सोन्या-चांदीचे नवीन दर जाहीर झाले आहे. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ५६० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव ५२ हजारावर पोहोचला आहे.तर दुसरीकडे चांदी तब्बल ८५० रुपये प्रति किलोने महागली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २५० रुपयाने तर चांदी १२२० रुपयाने महागली होती.

जळगावचा आजचा सोने -चांदीचा दर? Gold Silver Rate Today
आज सोन्याचा भाव ५२,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी ६२,९७० रुपये प्रति किलोवर आली आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात.या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते. शुद्धतेनुसार सोन्याच्या (Gold purity) किंमतीत पुन्हा बदल होतो. ग्राहकाला या नवीन दराप्रमाणे सोने-चांदी खरेदी करता येते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तब्बल ०.७५ टक्के वाढ केल्याचे पडसाद जगभरातील भांडवली आणि कमॉडिटी बाजारावर उमटले. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. या दोन दिवसात सोने जवळपास ८१० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडेच चांदी देखील वाधरली आहे. दोन दिवसात चांदी २१०० रुपयांनी वाढली आहे.

दरम्यान, सोन्याचे भाव १ जून पासून सातत्याने कमी जास्त होत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५२,११० रुपये होते. तर मे महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर ५२,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. हा बदल गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरला. भावातील बदल गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला.

पुन्हा सोने चकाकले
दरम्यान ३ जून २०२० रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी ५२,४७० रुपयांवर पोहचले. त्यानंतर सोने १३ जून रोजी ५२,९०० पोहोचले होते. पण त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा पडले. सोन्याचे भाव १४ जून रोजी पडून ५१,८५० रुपयांवर येऊन पडले. म्हणजे एकाच दिवसात सोन्याचे दर तब्बल १०६० रुपयांनी कमी झाले. तर १५ जून रोजी ४८० रुपयांनी घसरून ५१,३०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र दोन दिवसापासून होत असलेल्या वाढीनंतर आता सोने पुन्हा ५३ हजाराच्या उंबरवठ्यावर आले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम
१६ जून २०२२ – रु ५१,६२० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो
१६ जून मे २०२२- रुपये ६२,१२० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते