जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । मागील काही दिवसापासून सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ झाली होती. मात्र आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोबतच चांदीही (Silver Rate) घसरली आहे. आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याच्या भाव ६३५ रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा भाव तब्बल १३८५ रुपयांनी घसरला आहे. यामुळे आज दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. Gold Silver Rate Today
काय आहे आजचा भाव?
मंगळवारी, १६ ऑगस्ट रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ५१,९५० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. याआधी सोन्याचा व्यवहार ५२,२६५ रुपयांच्या पातळीवर सुरू होता, मात्र मागणी नसल्याने भाव लवकरच खाली आले. तसेच आजच्या घसरणीनंतर चांदी ५७,८८८ रुपये प्रति किलोवर आली आहे. यापूर्वी चांदीचा व्यवहार ५८,५०१ रुपयांच्या पातळीवर सुरू होता. पण काही काळानंतर त्याने व्यापार सुरू केला, त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 2.23 टक्के घसरण झाली. दरम्यान शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
राज्यातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,३६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७८ रुपये आहे
दरम्यान, जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८,५०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३ हजार रुपये इतका आहे. तर चांदी ५९,८०० रुपये इतका आहे (हे सोन्याचे दर सूचक आहेत अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)