दिलासा! आज सोन्याचा दर घसरला, चांदी स्थिर ; पहा नवीन दर

मार्च 15, 2023 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२३ । ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या चार-पाच दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली. मात्र आज सोने दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या किमतीत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे चांदीचा दर मात्र स्थिर आहे. अशातच तुम्ही सुद्धा लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या.. Gold Silver Price Today

gold silver

आजचा सोन्याचा दर
मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर सुद्धा दिसून येत आहे. आज सकाळी जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत 100 रुपयाची मंगळवारी सोन्याचा दर 57,900 रुपये प्रति तोळा इतका होता.

आजचा चांदीचा दर?
आज चांदीचा दर स्थिर आहे. मात्र यात काल म्हणजेच मंगळवारी मोठी वाढ झाली होती. त्यात तब्बल 2600 रुपयाची वाढ झालेली दिसून आली होती. आज सकाळी चांदीचा दर 66,800 रुपये प्रति किलो इतका आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली असल्याचे दिसून आलीय. आज सोन्याच्या दर 57,398 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 66,638 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सोने चांदीची किंमत कशी ठरवली जाते?
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now