दोन आठवड्यात चांदी साडेपाच हजारांनी घसरली ; जळगावात असा आहे भाव?

जून 15, 2024 9:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२४ । गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण सुरू असून काल शुक्रवारी चांदीत ८०० रुपयांची घसरण होऊन ती ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. दोन आठवड्यात तर चांदीचे भाव पाच हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. दुसरीकडे सोने मात्र ७२ हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे

gold silver 1 jpg webp

त्यात २९ मे रोजी तर चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी- कमी होत गेले. काहीसा चढ-उतार होत असताना ८ जूनपासून तिचे भाव सतत कमी होत आहे. ८ जून रोजी ९२ हजार २०० रुपयांवर असलेल्या चांदीचे भाव १० जून रोजी ८९ हजार ३०० रुपयांवर आले. आता पुन्हा १४ रोजी त्यात ८०० रुपयांची घसरण झाली व चांदी ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले आहे. ९४ हजारांवर गेलेल्या चांदीच्या भावात आता मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपासून सोने मात्र ७२ हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now