⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खुशखबर..! 2 दिवसात सोने दीड हजाराहून स्वस्त, चांदीही झाली स्वस्त, चेक करा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । तुम्ही जर आज सोने आणि चांदी (Gold Silver Rate Today) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसापासून वधारत असलेला सोने-चांदीचा भाव आता घसरत असल्याचे दिसून येतेय. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात आज बुधवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४८० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ८२० रुपयाने घसरला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने १०६० रुपयाने घसरले होते तर चांदी १६६० रुपयाने स्वस्त झाली होती.

जळगावचा आजचा सोने -चांदीचा दर? Gold Silver Rate Today
आज बुधवारी सोन्याचा भाव ५१,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी ६०,९०० रुपये प्रति किलोवर आली आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात.या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते. शुद्धतेनुसार सोन्याच्या (Gold purity) किंमतीत पुन्हा बदल होतो. ग्राहकाला या नवीन दराप्रमाणे सोने-चांदी खरेदी करता येते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. यावर्षीच्या मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते ५५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत पोहचले होते. तर चांदी तब्बल ७३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र चार महिन्यात सोन्याचे दर जवळपास ४३०० ते ४४०० रुपयाहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा सध्याचा दर देखील त्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे १२ हजार ५०० रुपयाने कमी आहे.

गेल्या पंधरा दिवसाच्या चढ-उतारमध्ये सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयांनी महागले आहे.मात्र या आठवड्याच्या तीन दिवसात सोने एक वेळा महागले तर दोन वेळा स्वस्त झाले आहे. या दोन दिवसाच्या घसरणीत सोने जवळपास ८५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर चांदी सुमारे १९५० रुपयाने घसरली आहे.

दरम्यान सध्या महागाई वाढत असल्यामुळे महागाई नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यात आरबीआयच्या वतीने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढल्याचा परिणाम हा सोन्याच्या भावावर दिसत असून, सध्या सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र पुढील काळात सोन्याच्या दरात काहीशी तेजी पहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते