सोनं पुन्हा रेकॉर्ड तोडणार ; एकाच दिवसात किंमतीत झाली मोठी वाढ, खरेदीदारांना फुटला घाम..

मार्च 14, 2023 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२३ । गेल्या चार दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price) भाव वाढीची गुढी उभारली आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 55 हजाराच्या घरात आला होता. मात्र त्यात शुक्रवारपासून मोठी वाढ झाली. जळगाव सराफ बाजारात आज सोन्याचा दर 58 हजाराच्या नजीक आला आहे. त्यामुळे लग्न सराईच्या हंगामात वधू-वर पित्याच्या आनंदात विरजण पडले आहेत. तर वऱ्हाडींच्या चिंतेतही भर पडली आहे.

gold silver rate 1

जळगावातील आजचा सोन्याचा दर?
कालच्या तुलनेपेक्षा आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. यापूर्वी काल सोमवारी सोन्याचा दर 57,200 रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात 700 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.

यापूर्वी गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59000) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर घसरण दिसून आली होती, परंतु आता सोने पुन्हा विक्रमी पातळीकडे जात असल्याचे दिसून येतेय. दरम्यान आगामी काही दिवसात साेन्याचे दर 60 हजार‎ रुपयांचा टप्पा पार करण्याचा अंदाज‎ जाणकारांनी व्यक्त केला आहे

जळगावातील आजचा चांदीचा दर :
दुसरीकडे एकाच दिवसात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. काल सोमवारी चांदीचा दर 64,200 रुपये प्रति किलो इतका होता. आज मंगळवारी सकाळी चांदीचा दर 66,800 रुपये प्रति किलो इतका आहे. म्हणजेच 24 तासात चांदी तब्बल 2600 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. दरम्यान, मागील आठवड्यात चांदीच्या किमतीत जवळपास 3000 हजार रुपयांची घसरण दिसून आलीय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11.30 वाजेपर्यंत सोन्याच्या दर 57,561 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 66,700 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now