सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, वाचा प्रति 10 ग्रॅमचा दर

सप्टेंबर 13, 2022 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे तो 25 सप्टेंबर 2022 पर्यंत चालेल. जर पितृ पक्षामध्ये तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या सकाळच्या सत्रातील सोने आणि चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. तर चांदीही घसरली आहे. Gold Silver Rate 13 September 2022

gold silver jpg webp

MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 251 रुपयांनी घसरून 50,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले. आज सोन्याचा व्यवहार 50,525 रुपयांपासून सुरू झाला. पण त्यानंतर सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. दुसरीकडे आज चांदीच्या भावात घसरण दिसून आलीय. आज चांदीचा प्रति किलोचा दर 365 रुपयांनी घसरून 57,126 रुपयावर आला आहे. यापूर्वी सोमवारी सकाळच्या सत्रात चांदीच्या भावात वाढ दिसून आली होती. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोमवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,400 रुपये इतका होता. तो आज घसरून जवळपास 51,150 रुपये इतका आहे. मात्र चांदी महागलेली दिसून आलीय. सोमवारी चांदीचा दर 56,500रुपये इतका होता. तो आज जवळपास 56,650 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, देशात सणासुदीला सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now